E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
स्मृती मानधना ठरली सर्वाधिक शतके झळकाविणारी जगातील तिसरी फलंदाज
Samruddhi Dhayagude
12 May 2025
कोलंबो : भारतीय महिला संघाची स्टार सलामीवीर फलंदाज स्मृती मानधनाने आणखी एक शतक झळकावले आहे. भारतीय महिला संघ आणि श्रीलंका महिला संघात त्रिकोणीय मालिकेतील अंतिम सामना सुरू आहे. या सामन्यात स्मृती मानधनाने श्रीलंकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. यादरम्यान शतक पूर्ण करताच तिच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.
स्मृती मानधना ही वनडे क्रिकेटमध्ये भारतीय महिला संघासाठी सर्वाधिक शतके झळकावणारी फलंदाज आहे. आता तिच्या नावे आणखी एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. स्मृती मानधना ही महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारी जगातील तिसरी फलंदाज ठरली आहे.या खेळीदरम्यान तिने श्रीलंकेच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले तिने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत आपलं शतक पूर्ण केलं आणि हा रेकॉर्ड देखील आपल्या नावावर केला.
स्मृती मानधनाने या सामन्यात फलंदाजी करताना ९२ चेंडूत २ षटकार आणि १२ चौकारांच्या साहाय्याने आपलं शतक पूर्ण केलं. हे तिच्या वनडे कारकिर्दीतील ११ वे शतक ठरले आहे. ती वनडे क्रिकेटमध्ये ११ पेक्षा जास्त शतकं झळकावणारी जगातील तिसरीच महिला क्रिकेटपटू ठरली आहे. हे शतक पूर्ण करताच तिने इंग्लंडची स्टार फलंदाज टॉमी ब्यूमोंटला मागे सोडलं आहे. टॉमी ब्यूमोंटच्या नावे वनडे क्रिकेटमध्ये १० शतकं झळकावण्याची नोंद आहे.
या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर स्मृती मानधनाने प्रतिका रावलसोबत मिळून डावाची सुरूवात केली. भारतीय संघाला सुरूवातीलाच धक्का बसला. प्रतिका रावल ४९ चेंडूत ३० धावा करत माघारी परतली. त्यानंतर स्मृती मानधनाने हरलीन देवोलसोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली. हरलीनने ४७ धावा केल्या. तर कर्णधार हरमनप्रीत कौर ४१ धावा करत माघारी परतली. जेमिमा रॉड्रीग्जने देखील ४४ धावांचे योगदान दिले. शेवटी भारतीय संघाला ५० षटकअखेर ७ गडी बाद ३४२ धावांचा डोंगर उभारण्यात यश आलं. भारतीय संघाने गुणतालिकेत अव्वल स्थानी राहून फायनलमध्ये प्रवेश केला.भारताने मालिकेतील ४ पैकी ३ सामने जिंकले. आता फायनलमध्येही भारतीय संघ मजबूत स्थिती आहे.
सर्वाधिक शतके झळकावणारे फलंदाज
मेग लेनिंग ( ऑस्ट्रेलिया ) -१५ शतके
सुजी बेट्स ( न्यूझीलंड) -१३ शतके
स्मृती मानधना ( भारत) - ११ शतके
टॅमी ब्यूमोंट ( इंग्लंड)- १० शतके
हेली मॅथ्यूज (वेस्टइंडिज) - ९ शतके
Related
Articles
थायलंडची सुचाता ठरली ’मिस वर्ल्ड’
01 Jun 2025
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण
03 Jun 2025
बाजार समिती वाद-विवाद निवारणात १६५ तक्रारी निकाली
30 May 2025
भारत आणि अमेरिकेत तात्पुरता व्यापार करार
29 May 2025
अंगणवाडी भरतीसाठी ऑनलाइन प्रणाली
03 Jun 2025
कसदार विनोद निर्मितीसाठी सहिष्णू वातावरण गरजेचे
03 Jun 2025
थायलंडची सुचाता ठरली ’मिस वर्ल्ड’
01 Jun 2025
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण
03 Jun 2025
बाजार समिती वाद-विवाद निवारणात १६५ तक्रारी निकाली
30 May 2025
भारत आणि अमेरिकेत तात्पुरता व्यापार करार
29 May 2025
अंगणवाडी भरतीसाठी ऑनलाइन प्रणाली
03 Jun 2025
कसदार विनोद निर्मितीसाठी सहिष्णू वातावरण गरजेचे
03 Jun 2025
थायलंडची सुचाता ठरली ’मिस वर्ल्ड’
01 Jun 2025
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण
03 Jun 2025
बाजार समिती वाद-विवाद निवारणात १६५ तक्रारी निकाली
30 May 2025
भारत आणि अमेरिकेत तात्पुरता व्यापार करार
29 May 2025
अंगणवाडी भरतीसाठी ऑनलाइन प्रणाली
03 Jun 2025
कसदार विनोद निर्मितीसाठी सहिष्णू वातावरण गरजेचे
03 Jun 2025
थायलंडची सुचाता ठरली ’मिस वर्ल्ड’
01 Jun 2025
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण
03 Jun 2025
बाजार समिती वाद-विवाद निवारणात १६५ तक्रारी निकाली
30 May 2025
भारत आणि अमेरिकेत तात्पुरता व्यापार करार
29 May 2025
अंगणवाडी भरतीसाठी ऑनलाइन प्रणाली
03 Jun 2025
कसदार विनोद निर्मितीसाठी सहिष्णू वातावरण गरजेचे
03 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
चेरीचा हंगाम बहरला
4
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
5
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी
6
विदर्भ, मराठवाड्यात मान्सून दाखल